अट्टल दुकान फोडणारे चोरटे हिगणघाट पोलीसाचे जाळयात

Mon 09-Jun-2025,09:26 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :असिफ मलनस हिंगणघाट

हिंगणघाट पोलीस स्टेशन हिंगणघाट मध्ये सतत 5 महीन्यापासुन दुकान फोडुन चोरी होत आहे पण चोराबददल कोणताही सुगावा लागत नव्हता, चोर हा टिनाचे दुकान असेल त्याच दुकानावर चडून टीनाला कसुन असलेले नट-बोल्ट पाणा पेन्चीस नी काढुन व टीना वाकवुन दुकानात प्रवेश करीत असे अश्या चोराची पद्धत लक्षात घेता त्याच प्रकारचे चो-या यवतमाळ जिल्हात पोलीस स्टेशन बाभुळगाव राळेगाव, कळंब, अमरावती जील्हयात अकोला जिल्हयात चोराचा शोध घेत असता दरम्यान आढळुन आल्या त्याचे दुकानातील व्हिडीओ स्पष्ट फुटेज बारकाईने बघीतले असता हा चोरटा तोच असल्याचे निष्पन्न झाले पण काहीही केल्याने चोरटा पोलीसाच्या हाती येत नव्हता, चोरीची पद्धत बघीतली असता वांरवार ईतर जिल्हयात अश्याच प्रकारच्या चो-या झाल्याची माहीती मिळाली.

अशीच चोरी दि. 20/05/2025 चे रात्र दरम्यान झाली असता, घटनास्थळाची निटसर पाहणी केली असता दुकानाचे वरील टिनाचे नट काढुन व टिन वाकवुन दुकानात प्रवेश केला ही चोरी याच चोरटयानी केली आहे हा पोलीसाचा पुर्ण विश्वास झाला असता हिगणघाट मधील कार्यरत असलेले मा. देवेन्द्र ठाकुर, पोलीस निरीक्षक, ठाणेदार साहेबानी गुन्हे प्रगटीकरण पथक पो.हवा यशवंत गोल्हर यांची टिमला प्राचारण करून सदर चोरी बाबत विशेष मार्गदर्शन देवुन चोरांचा शोध करण्यास सांगण्यात आले, ठाणेदार साहेबानी हिंगणघाट मधील दुकान फोडी बाबत व बाहेर जिल्हयातुन याच प्रकारचे चोरी होत आहे व हा चोर हाच आहे हा चोराचे चोरी दरम्यान काही विशेष लक्ष करण्यासारखे चुका केल्या व तो चोर यातच पोलीसाचे जाळ्यात लटकला. एक गोष्ट पोलीसांना नेहमीच तपासा दरम्यान हटकत होती ती म्हणजे चोरी केल्यावर भारी भक्कम बॅग उचलुन तो कशावर तरी नेत असेल ते वाहन कोणते ? चोरी करण्याची दिशा कोणती ? नेहमी चोर कोणती चोरी केल्यावर कोठे जायचा? हे बारीक बारीक मुद्दे आरोपी शोध घेतांना लक्षात करण्यात आले होते यात सायबर कक्ष, वर्धा यांचा मोलाचा वाटा त्यांची वेळोवेळी मदत मिळत असे व सायबर सेल नेहमी आम्हचा तपास चोरटयाचे दिशेने जात आहे हे लक्षात आणुन पण दिले. चोरटे हा वेळोवेळी मोबाईल बदलवीत असे पण त्या मुळे तपासात फार काही अडचण होत नव्हती कारण ते चोरटे पोलीसाचे काही अतंरावरच होते, आम्ही बुलडाणा, मलकापुर, शेगाव अमरावती या जिल्हयात 15 दिवसापासुन पाठलाग करणे सुरू केले त्यात असे लक्षात आले की हे आता हिगणघाट येथे येणार, कारण की त्यानी केलेली चोरीचा माल हे ते हिंगणघाट येथील पानटपरीवरच विकायचे यातुन चोरटयानी आपले चांगले ग्राहक पण तयार केले होते पण दुकानदाराना हा चोरीचा माल असल्याचा काहीच सशंय नव्हता यावरून आम्ही हिगणघाट परीसरात जास्त पेट्रोलीग करणे सुरू केले व पेटेोलींग दरम्यान एल.आय.सी कार्यालय, हिंगणघाट येथे एका दुचाकीवर दोन युवक सशंयितरित्या फिरतांना पोलीसाना दिसले असता त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता 1) उमेश उर्फ गरीबा श्रावण तुंबवाड, वय 37 वर्ष, रा.पळसा, ता. माहुर, जि. नांदेड 2) शुभम अनिल कांबळे, वय 28 वर्ष, रा. अशोक नगर, वर्धा यांची सखोल विचारपुस करून त्यांचे ताब्यातील बॅग व थैलीची पाहणी केली असता त्यामध्ये साडया, पॅन्ट, मोबाईल, व दुकानफोडीचे पाणा-पेन्चींस मिळुन आल्याने त्याची पोलीस स्टेशन येथे सखोल चौकशी केल्यावरून पोलीस स्टेशन येथे नोंद असलेला अप.क 571/25 मधील चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत झाल्याने त्यांना विचारपुस केली असता हिगणघाट हद्दीत चो-या केल्याचे कबुल केले असता सदर गुन्हयात अटक करून मा. न्यायदंडाधिकारी यांचे समोर उभे करून पोलीस कस्टडी रिमांड घेतला असता तपास सुरू केला असता यवतमाळ जिल्हयात, बाभुळगाव, कळंब, यवतमाळ तसेच अमरावती, अकोला, बुलडाणा, व वर्धा जिल्हयात चो-या केल्याची कबुली दिली. आतापावेतो एकुण 13 चो-या उघड करण्यात आल्या असुन या चोरट्यानी भरपुर प्रमाणात चो-या केल्याचे मान्य केले आहे त्यावरून बाहेर जिल्हयातील पोलीस स्टेशन ठाणेदाराशी संपर्क साधने सुरू आहे

हे दोन्ही आरोपी अट्टल चोर असुन हे गंभीर गुन्हयातील उमेश उर्फ गरीब्या श्रावण तुंबवाड हा खुन सारख्या गुन्हयात आरोपी असुन शुभम अनिल काबंळे हा पोक्सो 376 मधील गुन्हयात यांचे विरोधात न्यायालयात खटला सुरू आहे. या दोन्ही चोरटयाना ज्या-त्या ठिकाणी माल विकला तेथुन माल हस्तगत केला. आतापावेतो आरोपी कडुन एक नवीन हिरो होन्डा कंपनीची प्लेन्डर प्लस मोटर सायकल सह वेग-वेगळ्या गुन्हयातील मोबाईल, साड्या, पॅन्ट, काजु, बदाम, वेगवेगळया कंपनीचे सिगरेटचे पॉकेट, कच्ची सुपारी, निसर्ग पॉकेट, 43 नंबरचे बिडीचे बंडले असा भरपुर प्रमाणात माल व काही नगदी रोकड असा एकुण 1,97,923 /- रूपयाचा माल हस्तगत करण्यात पोलीसाना यश मिळाले.

गुन्हयासंबंधीत सदरची कार्यवाही मा.श्री. अनुराग जैन, पोलीस अधिक्षक साहेब, वर्धा मा. श्री. सागर कवडे, अप्पर पोलीस अधिक्षक, मा.श्री. रोशन पंडीत, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात पो.नि. देवेन्द्र ठाकुर, ठाणेदार, पो.स्टे हिंगणघाट, यांचे निर्देशनात गुन्हे प्रगटीकरण पथक पो.हवा यशवंत गोल्हर, ना.पो.कॉ विकास अवचट, नरेन्द्र आरेकर, राकेश आष्टनकर, पो.शि दिपक हाके तसेच सायबर सेल, वर्धा मधील पो.हवा दिनेश बोथकर, अक्षय राउत, ना.पो.कॉ गोंविद मुडें यांनी कार्यवाही केली, पुढील तपास पो.हवा यशवंत गोल्हर हे करीत आहे.